Fri. Apr 17th, 2026

पदोन्नती आरक्षण मिळविण्यासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा!

Spread the love

पदोन्नती आरक्षण मिळविण्यासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा!

पदोन्नती आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवारांच्या नियुक्तीवरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आक्रमक

सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

राज्यातील दलित मागासवर्गीयांच्या पदोन्नतील आरक्षण मिळविण्याकरिता ,ते जे पर्यंत मिळत नाही तोपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले.

ते आज काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाने “पदोन्नती तील आरक्षण “या विषयावर एका बैठकीचे आयोजन केले होते,त्यावेळी ते कार्यकर्त्यांना आश्र्वशित करताना बोलत होते.
या बैठकीत सोलापूर चे आमदार प्रणिती शिंदे,आमदार राजू पारवे,राज्याचे अनुसूची जाती विभागाचे अध्यक्ष उपस्थित होते.

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यांनी पदोन्नती ल आरक्षण विषयाच्या अनुषंगाने राज्यसरकार व उपमख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
राज्यसरकारचे काही संकेत असतात,मात्र त्याला ही काही मंत्र्याच्या माध्यमातून बगल दिली जाते,असाही आक्षेप राऊत यांनी घेतला.
मराठा आरक्षण विषयावर राज्यसरकार ने एक उपसमिती स्थापन केली,त्या समितीचे अध्यक्ष हे मराठा समाजातील मंत्र्यांना केले,पण इकडे पदोन्नती आरक्षण संदर्भातील उपसमितीवर दलित व मागासवर्गीय समाजातील मंत्र्याची नियुक्ती होण अपेक्षित असताना मराठा समाजातील मंत्री अजित पवार यांची नियक्ती कशी काय होऊ शकते असा आक्षेप राज्यमंत्री मंडळातील मंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागास वर्गीय पदोन्नती ल उपसमितीची आतापर्यंत एकच बैठक झाली आहे,त्या बैठकीत जो निर्णय घेण्यात आला त्याच्या विरोधाभास असलेले पदोन्नती ल आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि अधिसूचना काढली.यावेळी या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी या उपसमितीतील सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला.
अजित पवार यांच्या कडे या उपसमीतीचे अध्यक्षपद दिल्याने राज्यातील दलित समाजात या राज्यसरकार विरोधात प्रचंड अ्वस्थता आहे.
राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांचा पदोन्नती्ल आरक्षणास तीव्र विरोध आहे, पदोन्नती ल आरक्षण देण्या करीता अजित पवार निर्णय घेत नाहीत,तो पर्यंत अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा,त्या मोर्चात मी सहभागी होईल,असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां ना केले.
त्यामुळे काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.

माजी आमदार प्रकाश शेंडगे याचा अजित पवारांवर निशाणा:-

केवळ अजित पवार यांच्या सारख्या आडमुठ्या नेत्यांमुळे पदोन्नती आरक्षण रद्द झाले,पवारांच्या पदोन्नती आरक्षण रोखण्याच्या या निर्णयामुळे केवळ दलित, मागासवर्गीयांच्या नव्हे तर धनगर,वंजारी,व ओबीसी समाजाला फटका बसेल ,असा सणसणीत टोला अजित पवारांना
लगावला .

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य असल्याचे यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!