मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला इशारा!
सरकार चालविणे एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
राज्यातील महा विकास आघाडी सरकार हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झाले आहे,त्यामुळे हे महा विकास आघाडीचे सरक्रा टिकविणे व चालविणे एकट्या शिवसेनेची जवाबदारी नाही अशी स्पटोक्ती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या समोर केली.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट पवार यांच्या “सिल्व्हर ओक”या निवास्थानी भेट घेतली,त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात शरद पवारांजवळ नाराजी व्यक्त केली.
राज्यमंत्री मंडळातील मंत्री मुख्यमत्र्यांविरोधात जाहीर बोलतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री चढ्या आवाजात बोलतात,
हे योग्य नाही,
कांग्रेस मुळे राज्यसरकार आहे,काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार आहे हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.त्यामुळे ठाकरे या सतत च्या आरोप प्रत्यारोप मुळे नाराज झाले आहे त.
राज्यमंत्री मंडळातील मंत्री हे मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय मुख्यमंत्र्याच्या अगोदर मंत्री प्रसिध्दी माध्यमांसमोर जाहीर करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होत होते.त्यामुळे मंत्रीमंडळातील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जावे लागत होते.
शरद पवार व मु ख्यमंत्री यांच्यातील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकार मधील काही मंत्री व काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
काँगेसची सतत राज्यसरकार विरोधी वक्तव्ये:-
राज्यात महा विकास आघाडी सरकार अस्तित्वात आले पासून काँग्रेस सतत आक्रमक आहे.किमान समान कार्यक्रम राबविण्यात यावा,या मुद्यावर ठाम आहे,परंतु राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार हे पदोन्नती आरक्षण, सारथी संस्था यात सतत हस्तक्षेप करत आहेत.
त्यामुळे काँग्रेस राज्यसरकार नाराज आहे.
