उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर ला देण्याचा आदेश रद्द!
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांना शासनाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांचा आदेश
उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूसबिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवीन मुठा उजवा कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पचे सिंचन स्थिरीकरणकरन व सर्वेक्षण करण्याबाबतचा 22एप्रिल2021रोजी निगर्मित केलेला शासन पत्र या आदेशा द्वारे रद्द करण्यात येत आहे,असे शासनाचे उपसचिव वैजनाथ चिले यांनी दिले आहेत.
सदर आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
