Fri. Apr 17th, 2026

रेमडेसिवीरही कोरोना उपचाराच्या यादीतून होणार बाद? डॉ. राणा यांनी दिली महत्त्वाची माहिती…….

Spread the love

रेमडेसिवीरही कोरोना उपचाराच्या यादीतून होणार बाद?
डॉ. राणा यांनी दिली महत्त्वाची माहिती…….

कोरोना रुग्णावर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोरोना उपचाराच्या यादीतून वगळली.
प्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही कोरोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत.
कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर वापरामुळे चांगले परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं सांगत त्यांनी हे इंजेक्शन लवकरच यादीतून वगळले जाण्याचे सुतोवाच दिले आहेत.
डॉ. राणा यांनी ‘ए.एन.आय.’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. राणा म्हणाले, “प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अॅण्टीबॉडीज देतो,
जेणेकरून त्या अँण्टीबॉडीज विषाणूला संपवतील.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अॅण्टीबॉडीज तयार होतात.
मात्र, प्लाझ्मा दिल्यामुळे रुग्णाच्या तब्येतीमध्ये कोणताही प्रकारची सुधारणा होत असल्याचं दिसून आलेलं नाही.
मागच्या एका वर्षापासून आम्ही हे बघत आहोत.
त्याचबरोबर प्लाझ्मा सहजपणे उपलब्धही होत नाहीये.
वैज्ञानिक आधारावर प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली होती,
मात्र पुराव्याआधारे ती थाबंवण्यात आली आहे,” अशी माहिती डॉ. राणा यांनी दिली.
“कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांविषयी बोलायचं झाल्यास, रेमडेसिवीर कोरोना रुग्णावर काही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
रेमडेसिवीर औषधी कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही ,
त्यामुळे ते उपचाराच्या यादीतून वगळायला हवे.

Related Post

error: Content is protected !!