Fri. Apr 17th, 2026

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओमायक्रॉनचा शिरकाव , जुन्नरमध्ये ७ जणांना लागण

Spread the love

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओमायक्रॉनचा शिरकाव , जुन्नरमध्ये ७ जणांना लागण

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे येथील जुन्नर ( नारायणगाव ) मधील वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचे एकूण ७ रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागातही या नव्या विषाणूच्या शिरकावाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील हे ७ रूग्ण पंधरा दिवसापूर्वी दुबईवरून आले होते. त्यानंतर मागील शनिवारी त्यांचा अहवाल पुण्याच्या एनआयव्ही संस्थेत पाठविण्यात आला होता . शुक्रवार, दि. १७ रोजी तो ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील ५० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह ७ ही रूग्णांची प्रकृती स्थिर आहे . त्यांना नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे .

Related Post

error: Content is protected !!