कृषिदूतांनो भारीच! रांगोळीतून रेखाटला बोराटवाडीचा “नकाशा “

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि.12 डिसेंबर 2024 : बारामती कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी
ओंकार झेंडे , शंकरानंद स्वामी, गिरीश शितोळे, संकेत झेंडे , प्रणित ननावरे , मनोज लडकत , मंगेश कामठे ,निर्भय शेंडगे हे बोराटवाडी तालुका इंदापूर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव
कार्यक्रमा अंतर्गत येथे ३ महिन्या साठी मुक्कामी आहेत .
कृषी कार्यानुभव अंतर्गत सुरू असलेल्या अनेक प्रयोगांनी व प्रात्यक्षिकांनी येथील नागरिकांना शेती निगडीत माहिती देण्याचे काम हे कृषीदूत करत आहेत.
या कृषिदूतांनी,संस्थेचे मुख्याधिकारी एस.पी.गायकवाड आणि व्ही.एस.बुरुंगुळे याच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर बोराटवाडी गावाची सुंदर अशी रांगोळी रेखाटली .
यात गावातले प्रमुख रस्ते, शेती,ग्रामपंचायत, मंदिरे , नदी , प्राथमिक विद्यालय, पाणपोई , व इतर महत्वाची ठिकाणे दाखवण्यात आली .
या वेळी गावचे सरपंच श्री.दत्तू यशवंत सवाशे व उपसरपंच श्री.अभिजीत विठ्ठल फडतरे, ग्रामसेवक श्री.भाऊसाहेब सवाशे व इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.
