रेडणीत ‘चारा डेपो’ सुरु करण्यासाठी ‘सुप्रिया सुळेना ‘निवेदन!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर तालुक्यात दुष्काळ परिस्थिती आहे. जनावरांना चारा उपलब्ध नाही. चाऱ्या अभावी इंदापूर तालुक्यातील पशुधन अडचणीत आले आहे. इंदापूरातील जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर सरकारने उपाय योजना करावी यासाठी चारा डेपो रेडणी गावात सुरु करावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे रेडणी येथील माऊली हाके, दिपक तरंगे, सोमनाथ काळकुटे,राहुल काळकुटे यांनी इंदापूरात शासकीय विश्रामगृहात बारामती च्या लोकप्रतिनिधी सुप्रिया सुळे यांना निवेदन देऊन केली.
या निवेदनाचा विचार करून राज्यसरकार कडे मागणी करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
यावेळी रेडणी गावातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महिला शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
