Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
श्री संत गुलाबबाबा मंदिर रेडा येथे सभा मंडपासाठी “खासदार सुप्रिया सुळे “यांच्या निधीतून 20 लाख रुपये-महारुद्र पाटील – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

श्री संत गुलाबबाबा मंदिर रेडा येथे सभा मंडपासाठी “खासदार सुप्रिया सुळे “यांच्या निधीतून 20 लाख रुपये-महारुद्र पाटील

श्री संत गुलाबबाबा मंदिर रेडा येथे सभा मंडपासाठी “खासदार सुप्रिया सुळे “यांच्या निधीतून 20 लाख रुपये-महारुद्र पाटील

(शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मौजे रेडा येथील संत गुलाबबाबा मंदिराच्या सभा मंडपासाठी “खासदार सुप्रिया सुळे “यांच्या निधीतून 20 लाख रुपये देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली.

आज दि.9 मार्च 2024 रोजी इंदापूर तालुक्यातील मौजे रेडा (गुलाबनगर) येथे श्री संत गुलाबबाबा यात्रेनिमित्त तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या “कार्याची माहिती “व “कार्यकर्ता संवाद “साधण्यासाठी महारुद्र पाटील आलेले होते.

यावेळी ते संत गुलाबबाबा यांच्या भक्तांची गर्दी पाहून भारावून गेले,तसेच पुढील वर्षी काल्याचे कीर्तन हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम खासदार महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या फंडातून दिलेल्या सभामंडपातच होईल अशी ग्वाही दिली. त्यासाठी वीस लक्ष रुपयांची तरतूद केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

श्री संत गुलाब बाबा संस्थानाच्या वतीने कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, संपर्कप्रमुख अमोल मुळे यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन इंदापूर तालुका सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष पांडूरंग मोहिते,इंदापूर तालुका संपर्क प्रमुख शशिकांत सोनटक्के,लिगल सेलचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष राहुल बनसोडे,इंदापूर तालुका सरचिटणीस काशिनाथ देवकर,
यांनी केले.

या कार्यक्रमास श्री संत गुलाब बाबा गावातील व इंदापूर तालुक्यातील भक्तांसह,सामाजिक कार्यकर्ते राहुल बोबडे, नवनाथ देवकर,तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Post