Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथे नॅक समिती ( राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद) यांनी भेट दिली. नॅक समितीचे अध्यक्ष मिझोराम विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक संजय कुमार व समन्वयक सदस्य डॉ एडविन ज्ञानदास यांचे स्वागत संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव वीरसिंह रणसिंग यांनी केले.यावेळी विश्वस्त वीरबाला पाटील ,कुलदीप हेगडे शंकरराव रणसिंग, प्राचार्य डॉ अंकुश आहेर, डॉ विलास बुवा डॉ प्रशांत शिंदे ,डॉ.सुहास भैऱट उपस्थित होते. हलगी तुतारी ,सनई, सुरांच्या निनादात व टाळ्यांच्या गजरात महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

नॅक समितीचे अध्यक्ष संजय कुमार व समन्वयक सदस्य डॉ एडविन ज्ञानदास यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रम, उपक्रम ,अध्यापन व अध्ययन मूल्यमापन, संशोधन व सामाजिक उपक्रम ,भौतिक सुविधा, विद्यार्थी केंद्रित उपक्रम ,महाविद्यालय प्रशासन ,सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती घेत पाहणी केली. महाविद्यालयातील विद्यार्थी ,माजी विद्यार्थी ,पालक यांच्याशी संवाद साधला.ग्रंथालय विभाग, जिमखाना, सायन्स लॅब, संगणक लॅब ,वनस्पतीशास्त्र उद्यान, कार्यालय इत्यादी विभागांना भेट देत प्राध्यापक व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत पहाणी केली. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयात भौतिक सुविधा सह शैक्षणिक दर्जा व विद्यार्थी हित या दृष्टीने संस्था व महाविद्यालय प्रगतशील वाटचाल करत असल्यामुळे नॅक समितीने सर्व विभागाची पाहणी करून संस्था व महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले असल्याची माहिती दिली.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय कला संस्कृतीचे दर्शन घडविले. नॅक समिती भेटीवेळी महाविद्यालयातील डॉ. विजय केसकर,प्रा.राजेंद्र कुमार डांगे डॉ रामचंद्र पाखरे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, प्रा विनायक शिंदे,प्रा ज्योत्स्ना गायकवाड ,डॉ तेजश्री हुंबे , प्रा. मयूरी पाटील, प्रा अभिजीत शिंगाडे ,प्रा बबन साळवे इत्यादी प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Post